हनी सिंगच्या 'धीरे-धीरे..' या गाण्यावर का नाराज झाली पूजा भट्ट

ऋतिक रोशन आणि सोनम कपूर यांच्यावर चित्रित केलेले 'धीरे धीरे से' हे गाणं लॉन्च करण्यात आले आहे. हे गाणे यो यो हनी सिंग यांने गायलेय. या गाण्याला अनेक लोकांनी पसंत केलेय. मात्र, भिनेत्री, निर्माता आणि दिग्दर्शक पूजा भट्ट ही गोष्ट खटकली आहे.

Updated: Sep 8, 2015, 04:35 PM IST
हनी सिंगच्या 'धीरे-धीरे..'  या गाण्यावर का नाराज झाली पूजा भट्ट title=

मुंबई : ऋतिक रोशन आणि सोनम कपूर यांच्यावर चित्रित केलेले 'धीरे धीरे से' हे गाणं लॉन्च करण्यात आले आहे. हे गाणे यो यो हनी सिंग यांने गायलेय. या गाण्याला अनेक लोकांनी पसंत केलेय. मात्र, भिनेत्री, निर्माता आणि दिग्दर्शक पूजा भट्ट ही गोष्ट खटकली आहे.

पूजा भट्टने ट्वीट केलेय. या गाण्याची नकल केली असली तरी मूळ 'धीरे धीरे से' या गाण्याला मागे टाकू शकत नाही. या ट्वीटबरोबर पूजाने मूळ गाणे शेअर केलेय.

तसेच पूजा भट्टचे वडील महेश भट्ट यांनी हे मूळ गाणे 'आशिकी' या सिनेमासाठी अनु अग्रवाल आणि राहुल रॉयवर चित्रित केलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.