हॉलिवूडचा हा अभिनेता झाला नवव्यांदा बाप

हॉलिवूड अभिनेता मेल गिब्स पुन्हा एकदा वडील झाला आहे. मेल गिब्स आणि त्याची प्रेमिका रोजालिंड रॉस हिने त्यांच्या मुलाला शनिवारी जन्म दिला. जॉर्न लार्स गेरॉर्ड असं त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं आहे.

Updated: Jan 27, 2017, 12:34 PM IST
हॉलिवूडचा हा अभिनेता झाला नवव्यांदा बाप title=

मुंबई : हॉलिवूड अभिनेता मेल गिब्स पुन्हा एकदा वडील झाला आहे. मेल गिब्स आणि त्याची प्रेमिका रोजालिंड रॉस हिने त्यांच्या मुलाला शनिवारी जन्म दिला. जॉर्न लार्स गेरॉर्ड असं त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं आहे.

मेल गिब्सन आणि रोजालिंड रॉस यांच्या घरात नवा पाहुणा आल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात आहे. गिब्सनला त्याच्या आधीच्या पत्नीपासून सात मुलं आहेत. रुसमधील एका पियानो प्लेयर ओकसानासोबतही त्याचे संबंध होते आणि तिच्यापासूनही त्याला एक मुलगी आहे असं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं.

८० च्या दशकात मेल गिब्सन हे हॉलिवूडमधलं एक नावाजलेले नाव होतं. पॅशन ऑफ द ख्राईस्ट हा सिनेमा खूप गाजला होता. दिग्दर्शक म्हणूनही तो यशस्वी ठरला. मधल्या काही वैयक्तीक कारणांमुळे त्याच्या प्रतिमेला तडा गेला. त्यानंतर अनेक कारणांमुळे तो वादात सापडला.