शाहरूखचा 'रईस' आणि हृतिकचा 'काबील' कमाईत कोणी मारली बाजी?

किंग खान स्टारर रईस आणि हृतिक रोशन स्टारर काबिल या दोन्ही सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर कॉंटे की टक्कर बघायला मिळतेयं..मात्र बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहता 'रईस'चं रईस ठरण्याची चिन्हं दिसताये..

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 26, 2017, 11:29 PM IST
शाहरूखचा 'रईस' आणि हृतिकचा 'काबील'  कमाईत कोणी मारली बाजी? title=

मुंबई : किंग खान स्टारर रईस आणि हृतिक रोशन स्टारर काबिल या दोन्ही सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर कॉंटे की टक्कर बघायला मिळतेयं..मात्र बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहता 'रईस'चं रईस ठरण्याची चिन्हं दिसताये..

हृतिक रोशनच्या काबील या सिनेमाने पहिल्या दिवशी 10 कोटी 43 लाखांची कमाई केलीये..'रईस'ची तगडी टक्कर असतांनाही 'काबिल' बॉक्स ऑफिसवर 'काबिल' ठरला आहे..

तर दुसरीकडे शाहरुख खान आणि नवाझुद्दीन सिद्दीकी स्टारर रईस या सिनेमाने पहिल्या दिवशी 21 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे..रईसला 65 तर काबिलला 50 टक्के अॅडव्हान्स बुकिंग पहिल्या दिवशी मिळालं होतं..

आता बुधवार ते रविवार असा पाच दिवसांचा आठवडा मिळणार असल्यामुळे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करण्याची शक्यता आहे..