अखेर, कतरिनानं सलमानला टाळायचं कारण सांगितलंच!

सध्या, अभिनेता रणबीर कपूरसोबत लिव्ह इन रिलेशनशीप आणि प्रेमसंबंधांच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कतरिना कैफ हिनं आपल्या आणि सलमानच्या नात्यासंबंधी एक वक्तव्य केलंय. कतरिनाच्या अशा प्रतिक्रियेची तिच्या चाहत्यांनी कधी कल्पनाही केली नसेल.

Updated: Nov 14, 2015, 06:42 PM IST
अखेर, कतरिनानं सलमानला टाळायचं कारण सांगितलंच! title=

मुंबई : सध्या, अभिनेता रणबीर कपूरसोबत लिव्ह इन रिलेशनशीप आणि प्रेमसंबंधांच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कतरिना कैफ हिनं आपल्या आणि सलमानच्या नात्यासंबंधी एक वक्तव्य केलंय. कतरिनाच्या अशा प्रतिक्रियेची तिच्या चाहत्यांनी कधी कल्पनाही केली नसेल.

आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या कतरिनाच्या म्हणण्यानुसार, जर आता ती सार्वजनिकरित्या सलमान खानविषयी चर्चा करतेय तर हा तिच्या सद्य रिलेशनशीपचा अपमान असेल. 

दीर्घ काळापासून कतरीना आणि रणबीर यांच्या नात्याची चर्चा सुरू आहे. दोघांनी आपल्या नात्याला कधी स्वीकारलं नसलं तरी नकारही दिलेला नाही. दोघंही सध्या लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहेत. यासाठी रणबीरनं आपल्या आई-वडिलांचं घरही सोडलंय. 

पटकथा लेखक-गीतकार निरंजन आयंकर यांचा टॉक शो 'लूक व्हूज टॉकिंग विद निरंजन - सीझन २'मध्ये कतरिनाला तिच्या आणि सलमानच्या नात्याविषयी एक प्रश्न विचारण्यात आला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.