सुपरस्टार रजनिकांत यांना सिनेमावरून धमकी

रजनीकांत यांचा आगामी 'थलायवा' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान मिर्झा यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. पण रजनीकांत या आगामी सिनेमामुळे वादात सापडले आहेत.

Updated: May 13, 2017, 04:02 PM IST
सुपरस्टार रजनिकांत यांना सिनेमावरून धमकी title=

मुंबई : रजनीकांत यांचा आगामी 'थलायवा' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान मिर्झा यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. पण रजनीकांत या आगामी सिनेमामुळे वादात सापडले आहेत.

हाजी मस्तानचा दत्तक पुत्र असल्याचा दावा करणा-या सुंदर शेखर नावाच्या व्यक्तीनं रजनीकांत यांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. शेखरनं सुपरस्टार रजनीकांत यांना म्हटलं आहे की, 'मस्तान यांना सिनेमात एक तस्कर किंवा डॉनच्या भूमिकेत दाखवण्याची चूक करू नये'.