...तर केजरीवाल आणि मल्लिका एकत्र आले असते!

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल आपल्या राजकीय जीवनावरून अनेकदा चर्चेत राहिलेत. पण, सध्या ते चर्चेत आहेत ते त्यांना मिळालेल्या बॉलिवू़ड एन्ट्रीच्या चान्समुळे... 

Updated: Feb 20, 2015, 02:19 PM IST
...तर केजरीवाल आणि मल्लिका एकत्र आले असते! title=

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल आपल्या राजकीय जीवनावरून अनेकदा चर्चेत राहिलेत. पण, सध्या ते चर्चेत आहेत ते त्यांना मिळालेल्या बॉलिवू़ड एन्ट्रीच्या चान्समुळे... 

पण, ही संधी अरविंद केजरीवाल यांनी बाजुला सारून आपल्या पक्षाला पहिली पसंती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर आरुढ झालेले अरविंद केजरीवाल यांना काही दिवसांपूर्वी मल्लिका शेरावत फेम 'डर्टी पॉलिटिक्स' या सिनेमात काम करण्यासाठी ऑफर मिळाली होती.

पण, आपल्याकडे या सिनेमात काम करण्यासाठी वेळ नाही असं सांगत अरविंद केजरीवाल यांनी ही संधी धुडकावून लावली. 

'आम आदमी' ते मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना डर्टी पॉलिटिक्ससाठी ऑफर दिली गेली होती. या सिनेमाचं कथानक केजरीवाल यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्याशी मिळतं जुळतं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सिनेमाचं कथानक केजरीवाल यांनाही चांगलंच पसंत पडलं होतं. 

केजरीवाल यांनी 2013 साली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी शपथग्रहण केली होती. त्यानंतर, 49 दिवसांनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. याच सुमारास, त्यांना ही ऑफर मिळाली होती.

पण, आपल्या पक्षाच्या कामावर जास्त लक्ष केंद्रीत करायचंय, असं सांगत केजरीवाल यांनी ही ऑफर नाकारली होती. त्यानंतर ही भूमिका नसरुद्दीन शाह यांना मिळाली होती.

'डर्टी पॉलिटिक्स' या सिनेमात मल्लिका शेरावत हिच्याशिवाय जॅकी श्रॉफ, ओम पुरी आणि अनुपम खेर हेदेखील मुख्य भूमिकेत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.