या मालिकेत गोरिला करणार अभिनेत्रीबरोबर रोमान्स

कलर्स वाहिनीवर येणाऱ्या थपकी प्यार की या शो मध्ये गोरिला मालिकेच्या अभिनेत्रीबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे.

Updated: Jun 16, 2016, 09:43 PM IST
या मालिकेत गोरिला करणार अभिनेत्रीबरोबर रोमान्स title=

मुंबई : कलर्स वाहिनीवर येणाऱ्या थपकी प्यार की या शो मध्ये गोरिला मालिकेच्या अभिनेत्रीबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. भारतीय टीव्ही मालिकांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच गोरिला आणि अभिनेत्रीचा रोमान्स पाहायला मिळणार आहे. 

धृव आणि बिहाननंतर आता थपकी गोरिलाच्या प्रेमामध्ये पडणार आहे. थपकी या गोरीलाला घरीदेखील आणणार आहे. गोरिला घरी आल्यानंतर होणारा गोंधळ पुढच्या काही भागांमध्ये दाखवण्यात येणार आहे.