जेनेलियानं रितेश देशमुखला दिलं 'लय भारी' गिफ्ट

बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया डिसुजा आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या लग्नाला आज ४ वर्ष झाले.

Updated: Feb 3, 2016, 08:35 PM IST
जेनेलियानं रितेश देशमुखला दिलं 'लय भारी' गिफ्ट title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया डिसुजा आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या लग्नाला आज ४ वर्ष झाले. जेनेलियाने पती रितेशला इंस्टाग्रामवर एक फोटोसह मेसेज शेअर केला आहे. तर रितेशने ही त्यावर रिप्लाय दिलाय.

जेनेलिया आणि रितेश हे २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. आता दोघेही दुसऱ्यांदा माता-पिता होणार आहेत. नोव्हेंबर २०१५ मध्ये दोघांनी मुलगा रिआनचा वाढदिवस साजरा केला होता. 

रितेशचा लवकरच बँजो, ग्रेट ग्राँड मस्ती आणि हाऊसफूल- ३ सिनेमे सिनेचाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.