अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी मित्राला अटक

२४ वर्षाची टीव्ही अभिनेत्री श्रुतीने आत्महत्या केली आहे. तिने आपला मित्र श्रीकांतच्या घरी गळफास लावून घेतल्याचं म्हटलं आहे.

Updated: Mar 2, 2016, 04:05 PM IST
अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी मित्राला अटक title=

बंगळुरू : २४ वर्षाची टीव्ही अभिनेत्री श्रुतीने आत्महत्या केली आहे. तिने आपला मित्र श्रीकांतच्या घरी गळफास लावून घेतल्याचं म्हटलं आहे. द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, श्रुतीचं उमेशशी लग्न झालं होतं, तो एक उद्योजक आहे, हारोहल्लीच्या कामकापूरा रोडला ते राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रुती आपल्या मित्र श्रीकांतच्या घरी पार्टीसाठी गेली होती. ती मागील अनेक वर्षापासून मित्र होते, मात्र त्यांच्यात काही कारणांवरून भांडण झालं. ती अपसेट झाली आणि तिने स्व:ला मित्र श्रीकांतच्या घरात कोंडून घेतलं, यानंतर तिने गळफास लावून घेतल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणी आता श्रुतीचा पती उमेशने तिचा मित्र श्रीकांत विरोधात गुन्हा दाखल केला आहे, पोलिसांनी श्रीकांतला अटक केली आहे, पुढील चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.