पहिल्या हिंदी चित्रपटाचं पोर्न वेबसाईटवर प्रमोशन

'क्या कूल है हम ३'चं पोर्न वेबसाईटवर प्रमोशन

Updated: Dec 22, 2015, 07:15 PM IST
पहिल्या हिंदी चित्रपटाचं पोर्न वेबसाईटवर प्रमोशन title=

मुंबई : तुषार कपूर आणि आफताब शिवदासानी यांचा 'क्या कूल है हम 3' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झालाय. या सिनेमात असणाऱ्या अॅडल्ट दृश्यांमुळे हा सिनेमा चांगलाच चर्चेत आलाय. त्यातच या सिनेमाचा ट्रेलर हा ४० पोर्न वेबसाईटवर जारी केल्यामुळे तो आणखी चर्चेत आला आहे. 

बालाजी मोशन पिक्चर्सने सिनेमाच्या प्रमोशनसाठी हा नवीनच फंडा वापरलाय. पोर्न वेबसाईटला भेट देणाऱ्या लोकांची संख्या भारतात मोठी आहे. भारताचा जगात याबाबतीत चौथा क्रमांक आहे. 'क्या कूल है हम-3' या सिनेमाचा ट्रेलर आतापर्यंत ६,८९४,७६८ लोकांनी पाहिला आहे.

'क्या कूल है हम 3' हा सिनेमा २२ जानेवारीला रिलीज होणार आहे.