बॉक्स ऑफिस कलेक्शन : शिवाय विरुद्ध ए दिल है मुश्किल

 बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट शिवाय आणि करण जौहरचा बहुचर्चित ऐ दिल है मुश्किल, हे दोन सिनेमे वीकेंडला प्रदर्शित झाले आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवसाचं कलेक्शन पाहता, या दोन्ही सिनेमांच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमाचं पारडं जड दिसतंय.

Updated: Oct 29, 2016, 12:07 PM IST
बॉक्स ऑफिस कलेक्शन : शिवाय विरुद्ध ए दिल है मुश्किल title=

मुंबई : बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट शिवाय आणि करण जौहरचा बहुचर्चित ऐ दिल है मुश्किल, हे दोन सिनेमे वीकेंडला प्रदर्शित झाले आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवसाचं कलेक्शन पाहता, या दोन्ही सिनेमांच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमाचं पारडं जड दिसतंय.

ऐ दिल है मुश्किल या सिनेमानं पहिल्याच दिवशी तब्बल १३.३० कोटींची कमाई केली आहे तर दुसरीकडे अजय देवगणच्या शिवाय या सिनेमाने जवळपास ११ कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलंय.