फिल्म रिव्ह्यू : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा अमिताभ-फरहानचा 'वझीर'!

बिग बी अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर स्टारर  या वर्षीचा पहिला मोठा सिनेमा वझीर आज प्रदर्शित झालाय. बिजॉय नांमबियार दिग्दर्शित 'वझीर' ही गोष्ट आहे एटीएस ऑफिसर दानिश अली आणि पंडित ओमकारनाथ धार या दोन व्यक्तिरेखांची...

Updated: Jan 8, 2016, 01:13 PM IST
फिल्म रिव्ह्यू : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा अमिताभ-फरहानचा 'वझीर'! title=

चित्रपट - वझीर 
दिग्दर्शक - बिजॉय नाम्बियार
निर्माता - विधु विनोद चोप्रा
लेखक - विधु विनोद चोप्रा, अभिजात जोशी
कलाकार - अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, अदिती राव हैदरी, नील नितीन मुकेश, जॉन अब्राहम, मानव कौल
वेळ - १०४ मिनिट

जयंती वाघधरे, मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर स्टारर  या वर्षीचा पहिला मोठा सिनेमा वझीर आज प्रदर्शित झालाय. बिजॉय नांमबियार दिग्दर्शित 'वझीर' ही गोष्ट आहे एटीएस ऑफिसर दानिश अली आणि पंडित ओमकारनाथ धार या दोन व्यक्तिरेखांची...

कथानक
ही कथा आहे एटीएस ऑफिसर दानिश अली, आणि पंडीत ओमकारनाथ धार या दोघांची... फरहान अख्तर अर्थातच या सिनेमातला एटीएस ऑफिसर दानिश आपल्या पत्नी रुहानासोबत सुखी आयुष्य जगत असतो. अचानक एक दिवस त्याच्या आयुष्यात एक खूप मोठा ट्वीस्ट येतो. आपल्या कामाशी एकनिष्ठ असलेल्या दानिशला त्याची मुलगी गमवावी लागते. यानंतर दानिशचं आयुष्य बदलतं आणि त्याच दरम्यान त्याची भेट होते पंडित ओमकारनाथ धर यांच्याशी जी भूमिका साकारली आहे अभिनेता अमिताभ बच्चन यांनी...

 

सिनेमाचं स्क्रिप्टिंग... 
खरं तर सिनेमाच्या स्क्रिप्टला, बुद्धीबल या खेळाशी अगदी चोखपणे कनेक्ट करण्यात आलंय. लेखक अभिजात जोशीनं ज्या पद्धतीनं सिनेमाची स्क्रिप्ट डिझाईन केली आहे. त्यासाठी त्याला हॅटस ऑफ... याच अफलातून स्क्रिप्टमुळे सिनेमाची गती आणि फ्लोही फरफेक्ट वाटतो.

स्टार कलाकारांची फौज
बिग बी अमिताभ बच्चन यांनी साकारलेला पंडित कमाल झालाय. एका व्हील चेअरवर बसून, काही ठराविक लिमिटेशन्समध्ये इतका जबरदस्त परफॉर्मन्स करणं सोपं नाही... त्यांची देहबोली, चेहऱ्यावरचे हावभाव.... त्यांच्या एनर्जीला तोड नाही.

तर दुसरीकडे अभिनेता फरहान अख्तरनंही त्याची भूमिका चोख पार पाडली आहे. आपल्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे आत्मसात करुन जी काही कमाल कामगिरी फरहाननं केली आहे त्यासाठी त्याला १०० पैकी १०० गूण... या सिनेमात सरप्राइस पॅकेजमध्ये दिसतो अभिनेता जॉन इब्राहिम आणि नील नितीन मुकेश... याच बरोबर सिनेमात मानव कौलनं साकारलेली नेगेटिव्ह भूमिकाही छान झालीय. अभिनेता फरहान अख्तर आणि अदिती राव हैदरी या दोघांची केमिस्ट्रीही पडद्यावर सुंदर दिसते.


फरहान आणि अदिती

खिळवून ठेवणारा सिनेमा 
वझीर या सिनेमाचं संकलन असो किंवा कैमेरामध्ये कैद केलेले ते एक एक अँगल्स अतिशय सुंदर पद्धतीनं प्रझेंट करण्यात आलेत. सिनेमा अगदी सुरुवातीपासून शेवटापर्यंत तुम्हाला खिळवून ठेवतो. एका क्षणासाठीही तुमच लक्ष  हटत नाही.

सिनेमाचं संगीत
वझीर या सिनेमात मोजून दोन तीन गाणी आहेत. त्यातलं तेरे बिन हे गाणं सिनेमा रिलीज होण्याआधीच हिट ठरलं. 'अतरंगी यारी' हे गाणंही छान झालंय.
'वझीर' एक अतिशय इंटेलिजेन्ट थ्रीलर असा सिनेमा आहे.

काय वगळता आलं असतं?
सिनेमात अशा काही गोष्टी आहे ज्या पाहताना खटकतात. सिनेमा पाहिल्यावर अभिनेता नील नितीन मुकेश हा सिनेमात काय करतोय? हा प्रश्न तुम्हाला पडेल. काही गोष्टी लॉजिकल वाटत नाही, त्याच गोष्टी तर थोड्या फेरफार करुन सादर करता आल्या असत्या तर कदाचित सिनेमा आणखी मजेशीर झाला असता.

इतर 
सिनेमाची बांधणी, दिग्दर्शकानं सिनेमाला दिलेली ट्रीटमेन्ट, वझीरची कमाल स्क्रिप्ट, कलाकारांचे जबरदस्त परफॉर्मन्स या सगळ्या गोष्टी पाहता वझीर या सिनेमाला आम्ही देतोय ३.५ स्टार्स...