फिल्म रिव्ह्यू : 'कपूर अॅन्ड सन्स'ची धम्माल

मुंबई : या वीकेंडला काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर 'कपूर अॅण्ड सन्स' पाहण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे.

Updated: Mar 19, 2016, 02:29 PM IST
फिल्म रिव्ह्यू : 'कपूर अॅन्ड सन्स'ची धम्माल  title=

सिनेमा : कपूर अॅन्ड सन्स 

दिग्दर्शक : शकून बत्रा

कलाकार : ऋषी कपूर, फवाद खान, रत्ना पाठक, रजत कपूर, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा,  यश राजवंशी

वेळ : १३२ मिनिटे

मुंबई : या वीकेंडला काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर 'कपूर अॅण्ड सन्स' पाहण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. शकुनी बत्रा यांचं दिग्दर्शन असलेली 'कपूर अॅण्ड सन्स सिन्स 1921' हा चित्रपट गंभीर विषयाला अगदी विनोदीपणे हाताळतो. यात रोमान्स, विनोद, आणि फॅमिली ड्रामा या सर्वांचीच चांगली सरमिसळ आहे.

काय आहे कहाणी?

चित्रपटात फॅमिली ड्रामा, प्रेमाचा असणारा त्रिकोण यांच्यासोबत कौटुंबिक नात्यांमध्ये घडणाऱ्या घडामोडी आहेत. ऋषी कपूर जे 90 वर्षांचे आजोबा असतात त्यांची दोन नातवंडं राहुल कपूर (फवाद खान) आणि अर्जुन कपूर (सिद्धार्थ मल्होत्रा) हे त्यांच्या आजोबांना हार्ट अटॅक आल्याचे समजल्यावर पाच वर्षांनी त्यांना भेटायला येतात. या कुटुंबात हर्ष कपूर (रजत कपूर) आणि आई (रत्ना पाठक) सुद्धा असतात. त्यानंतर या दोन नातवंडांमध्ये टीया (आलिया भट) नावाच्या तरुणीवरुन मतभेद सुरू होतात. त्यांच्या या भांडणाभोवती या चित्रपटाची कथा फिरते. कॉमेडी आणि ड्रामा यांचा चित्रपटात चांगला मेळ साधला गेला आहे.

कोणी केलाय चांगला अभिनय?

ऋषी कपूर आणि एकंदरच सर्व कलाकारांनी चांगला अभिनय केलाय. चित्रपटाच्या स्क्रिप्टला त्यांनी न्याय मिळवून दिलाय. मध्यांतराच्या आधी या चित्रपटाचा वेग चांगला आहे जो तुमचं खूप मनोरंजन करू शकतो. पण, त्यानंतर मात्र चित्रपटाचा वेग मंदावतो. फिल्ममधील 'लड़की ब्यूटीफुल कर गई चुल' आणि 'बोलना' ही गाणी आधीपासूनच चर्चेत आहेत. तुम्हाला या चित्रपटातील कलाकार आवडत असतील तर हा चित्रपट तुम्ही पाहायलाच हवा. समीक्षकांनी या चित्रपटाला 5 पैकी 3 मार्क दिलेत.