डान्स करायला जॉन अब्राहमचा नकार

डान्स करायला जॉन अब्राहमनं दिला नकार

Updated: Jan 21, 2016, 09:30 PM IST
डान्स करायला जॉन अब्राहमचा नकार title=

कोणाच्याही लग्नामध्ये मी डान्स करणार नाही, कारण ते माझ्या नैतिकतेविरोधात आहे, असं वक्तव्य बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमनं केलंय. आयुष्यामध्ये मी काही तत्व पाळतो, आणि कोणाच्याही लग्नात नाच करणं माझ्या तत्वात बसत नाही, असं जॉन म्हणालाय. तसंच कोणत्याही ब्रँडची ऍड करायची का नाही हे मीच ठरवतो, त्यासाठी मी कोणत्याही एजंटची निवड केली नसल्याचं जॉननं सांगतिलं.
कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला जॉन हजेरी लावत नाही. अशा फंक्शनला जाणं मला आवडत नाही, या कार्यक्रमांमध्ये मला अस्वस्थ वाटतं, त्यामुळे मी पुरस्कार सोहळ्यांना जात नाही, अशी कबुलीही जॉननं दिलीये.