अक्षय कुमार - निम्रतच्या 'एअरलिफ्ट'चा फिल्म रिव्ह्यू

२०१५ साली बेबी, गब्बर इस बॅक, सिंग इस ब्लिंग आणि ब्रदर्सच्या यशानंतर खिलाडी कुमार अक्षय आपल्याला 'एयरलिफ्ट' या सिनेमातून २०१६ च्या सुरुवातीलाच पुन्हा पहायला मिळतोय. 

Updated: Jan 22, 2016, 12:48 PM IST
अक्षय कुमार - निम्रतच्या 'एअरलिफ्ट'चा फिल्म रिव्ह्यू  title=

दिग्दर्शक : राजा कृष्ण मेनन

निर्माता : निखिल अडवाणी आणि इतर

संगीत : अमाल मलिक, अंकित तिवारी

कलाकार : अक्षय कुमार, निम्रत कौर

वेळ : १२५ मिनिट

जयंती वाघधरे, मुंबई : २०१५ साली बेबी, गब्बर इस बॅक, सिंग इस ब्लिंग आणि ब्रदर्सच्या यशानंतर खिलाडी कुमार अक्षय आपल्याला 'एयरलिफ्ट' या सिनेमातून २०१६ च्या सुरुवातीलाच पुन्हा पहायला मिळतोय. यावेळी अक्षय काय कमाल करतो? 

काय आहे सिनेमाचं कथानक

१९९० साली घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारीत हा सिनेमा आहे... कुवैत आणि इराक युद्धावर बेतलेल्या एयरलिफ्ट या सिनेमात अक्षयनं एका कुवैती बिजनेसमनची भूमिका साकारली आहे. रंजीत असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असून कुवैत - इराक य़ुद्धादरम्यान तब्बल १,७०,००० भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर कसं काढायचं? हा मोठा प्रश्न रंजीतसमोर उभा राहतो. एक लाख सत्तर हजार लोकांचे प्राण वाचवण्यात तो यशस्वी ठरतो का? असा एक जबरदस्त प्रवास या सिनमात आपल्याला पहायला मिळेल.

कलाकार

राजा कृष्ण मेनन यांनी या सिनेमाचं दिगदर्शन केलं असून सिनेमा प्रेक्षकांना कितपत धरुन ठेवतो, खिळवून ठेवतो, हा एक मोठो प्रश्न सिनेमा करताना दिग्दर्शक राजा मेनन यांना पडला होता, पण ते साकारण्यात त्यांना नक्की यश आलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.. आणि त्यात सोने पे सुहागा म्हणजे अभिनेता अक्षय कुमारनंही एयरलिफ्ट या सिनेमाला पू्र्ण न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. सिनेमात अभिनेत्री निम्रत कौरनंही अक्षयला छान साथ दिली आहे. निम्रत या आधी लंचबॉक्स या सिनेमात झळकली होती.