पाक अभिनेता फवाद करणार ऐश्वर्यासोबत रोमान्स

करण जोहरचा आगामी सिनेमा 'ए दिल है मुश्लिक' या सिनेमातून अभिनेत्री ऐश्वर्या राय - बच्चन कमबॅक करणार हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे, प्रेक्षकांना या सिनेमात ऐश्वर्यासोबत अभिनेता कोण असेल याची उत्सुकता लागली होती... ती आता दूर झालीय.

Updated: Feb 3, 2015, 06:31 PM IST
पाक अभिनेता फवाद करणार ऐश्वर्यासोबत रोमान्स title=

मुंबई : करण जोहरचा आगामी सिनेमा 'ए दिल है मुश्लिक' या सिनेमातून अभिनेत्री ऐश्वर्या राय - बच्चन कमबॅक करणार हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे, प्रेक्षकांना या सिनेमात ऐश्वर्यासोबत अभिनेता कोण असेल याची उत्सुकता लागली होती... ती आता दूर झालीय.

तर... ऐश्वर्यासोबत या सिनेमात दिसणार आहे पाकिस्तानी अभिनेता फवाद खान... फवाद यापूर्वी, सोनम कपूरसोबत 'खूबसूरत' या सिनेमात दिसला होता. या सिनेमातून फवादनं प्रेक्षकांची मनंही जिंकली होती.  

'ए दिल है मुश्किल' या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन, रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा हेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात फवाद अभिनय करणार किंवा नाही याबद्दल अद्याप अधिकृतरित्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

यापूर्वी, प्रियांका चोपडा हिला आपल्या होम प्रोडक्शन सिनेमा 'मॅडमजी'साठी फवादला विचारणा केली होती... पण, बात कुछ बनी नहीं... अन् फवादला ही आणखी एक ऑफर मिळाल्याचं समजतंय. 

या सिनेमात ऐश्वर्यासोबत रोमान्स करण्याची संधी फवादला मिळू शकते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.