'बाजीराव मस्तानी' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

बाजीराव मस्तानी या रणबीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या नव्या सिनेमाचं गाणं यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे.

Updated: Oct 19, 2015, 03:48 PM IST

मुंबई : बाजीराव मस्तानी या रणबीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या नव्या सिनेमाचं गाणं यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे, या गाण्याचं ओपनिंग मराठी संगीत आणि मराठी शब्दांनी होतं. 

या गाण्यात प्रियंकाचा एक लूकही दाखवण्यात आला आहे, यात प्रियंकाची सर्वोत्तम अॅक्टिंग दिसून येतेय, सिनेमाच्या कहाणीप्रमाणे प्रियंकाचं दीपिकावरचं ते आतल्या आत जळणं दिसून येतं, प्रियांकाने काशीबाईची भूमिका केली आहे.

या गाण्याचे पुढील बोल हिंदीत आहेत. या सिनेमासाठी भव्य सेट उभारण्यात आलेला आहे, ऐतिहासिक सेटबद्दल अनेकांना उत्सुकता होती,  या गाण्यात दीपिका सोबत प्रियांकाचा लूक काय असेल हे देखील स्पष्ट होतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.