'एअरलिफ्ट'ची पाच दिवसांत बक्कळ कमाई

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि निम्रत कौर यांचा 'एअरलिफ्ट' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसांपासूनच हा चित्रपट चांगली कमाई करतोय. 

Updated: Jan 28, 2016, 09:40 AM IST
'एअरलिफ्ट'ची पाच दिवसांत बक्कळ कमाई title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि निम्रत कौर यांचा 'एअरलिफ्ट' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसांपासूनच हा चित्रपट चांगली कमाई करतोय. 

या चित्रपटाने वीकेंडमध्ये तब्बल ७२.५० कोटींचा गल्ला जमवलाय. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल १२.३५ कोटी कमावले होते. त्यानंतर शनिवारी १४.६०, रविवारी १७.३५, चौथ्या दिवशी सोमवारी १०.४० आणि पाचव्या दिवशी मंगळवारी १७.८० कोटींची कमाई केली. 

चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला चांगले रेटिंग दिलेय. खऱ्या कहाणीवर आधारित या सिनेमात अक्षय आणि निम्रत यांनी आपली भूमिका चोख बजावलीये. या चित्रपटाला टक्कर देणारा 'क्या कूल है हम ३' हा चित्रपट मात्र शर्यतीत खूपच मागे राहिलाय. पाच दिवसांत या चित्रपटाने २६.६५ कोटी कमावलेत.