आमिर खानचा ड्युप्लिकेट बेरोजगार, आमिर जबाबदार?

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट मि.आमिर खान त्याच्या आगामी फिल्म 'पीके'च्या यशाची स्वप्नं बघत असतानाच समोर आली आहे एक विचित्र घटना... एक अशी व्यक्ती आहे जी तंतोतंत आमिर खानसारखी दिसते, परंतु यामुळंच त्याला खूप मोठी किंमत द्यावी लागते.

Updated: Dec 16, 2014, 07:59 PM IST
आमिर खानचा ड्युप्लिकेट बेरोजगार, आमिर जबाबदार? title=

मुंबई: बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट मि.आमिर खान त्याच्या आगामी फिल्म 'पीके'च्या यशाची स्वप्नं बघत असतानाच समोर आली आहे एक विचित्र घटना... एक अशी व्यक्ती आहे जी तंतोतंत आमिर खानसारखी दिसते, परंतु यामुळंच त्याला खूप मोठी किंमत द्यावी लागते.

जिथं शाहरूखच्या ड्युप्लिकेटची सात ते आठ लाखांपर्यंतची कमाई होते, तिथं हा आमिर खानचा ड्युप्लिकेट मात्र अपवाद ठरला आहे.

आसाममध्ये राहणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे देवाशिष. तो सांगतो की जे दिग्दर्शक मला काम देतात ते फक्त आमिरची नक्कल करण्यास सांगतात त्याच्याव्यतिरिक्त कोणीच काही सांगत नाही. तसंच इतर कोणतीही फिल्म मला आजवर मिळालेली नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.