मुंबई : अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीवर आपल्या तीन महिन्याच्या गरोदर वहिनीला मारहाण केल्याचा आरोप आहे. कारण नवाझुद्दीनच्या वहिनीने तिला सासरच्या मंडळींकडून मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
आपल्यावर आरोप केल्याने प्रसिद्धीझोतात येण्याच्या इर्षेने वहिनीने आरोप केल्याचा दावा नवाझने केला आहे. तसेच नवाझुद्दीनने मात्र वहिनीचे आरोप धुडकावून लावले आहेत.
नवाझने २८ सप्टेंबर रोजी मारहाण केल्याचं नवाझुद्दीनच्या वहिनीने तक्रारीत म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या जिल्हा अधीक्षकांकडे तिने तक्रार नोंदवली आहे.
यावर बचाव करताना नवाझने सीसीटीव्ही फुटेज जारी केलं आहे. वहिनीचे काकाच यासर्व तक्रारींमागे असल्याचं नवाझने म्हटलं आहे. नवाझुद्दीनचा धाकटा भाऊ मिनाझुद्दीनचा विवाह ३१ मे २०१६ रोजी झाला होता.