शाहरुखचा 'दिलवाले' तीनच दिवसांत १०० कोटी पार

मसालापट सिनेमा असलेला दिलवालेने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य करतोय. प्रदर्शनानंतर अवघ्या तीनच दिवसांत या चित्रपटाने जगभरात मिळून तब्बल १०० कोटींचा आकडा पार केलाय. 

Updated: Dec 21, 2015, 05:00 PM IST
शाहरुखचा 'दिलवाले' तीनच दिवसांत १०० कोटी पार title=

मुंबई : केवळ मसालापट असलेला 'दिलवाले' सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य करतोय. प्रदर्शनानंतर अवघ्या तीनच दिवसांत या चित्रपटाने जगभरात मिळून कमाईमध्ये तब्बल १०० कोटींचा आकडा पार केलाय. 

पहिल्या दिवशी भारतात या चित्रपटाने २१ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २०.०९ आणि रविवारी तब्बल २४ कोटींचा गल्ला जमवला. एकट्या भारतात या चित्रपटाने ६५.०९ कोटींची कमाई केली. 

देशाबाहेरील थिएटरमध्ये या चित्रपटाने तीन दिवसांत ५६.३८ कोटी जमवले. एकूण मिळून जगभरात या चित्रपटाने १२१.४७ कोटी कमावलेत. लंडन आणि दुबईमध्येही या चित्रपटाचे प्रमोशन कऱण्यात आले होते.