मुंबई : ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांना प्रकृती अस्वास्थामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रात्री एक वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
सूत्रांच्या माहितीनुसार, ताप आल्यामुळं दिलीप कुमार यांची आधी घरी तपासणी करण्यात आली. पुढचे ७२ तास महत्त्वाचे असल्याचं डॉ. जलिल पारकर यांनी सांगितलं.
जर ४८ तासांत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही तर त्यांना आयसीयूमध्ये हलवणार असल्याची माहितीही पारकर यांनी दिलीय. सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांना रात्री उशीरा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.
९३ वर्षीय अभिनेते दिलीप कुमार यांचं खरं नाव मोहम्मद युसूफ खान आहे... परंतु, सिनेमांमध्ये आल्यानंतर त्यांनी दिलीप कुमार हे नाव धारण केलं. अंदाज, बाबुल, मेला, दीदार, जोगन आणि इतर काही सिनेमांत त्यांनी हताश नायकाची भूमिका केल्यानं त्यांना 'ट्रॅजडी किंग' म्हणूनही ओळखलं जातं.
दिलीप कुमार यांना २०१५ मध्ये पद्म विभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. यापूर्वी १९९१ मध्ये पद्म भूषण आणि १९९४ मध्ये भारतीय सिनेमात उल्लेखनीय योगदानासाठी 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'नं त्यांचा गौरव करण्यात आला होता.