१८ वर्ष जुन्या प्रकरणात दिलीप कुमार यांची निर्दोष मुक्तता

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची एका १८ वर्ष जुन्या प्रकरणात गिरगाव न्यायलायाने निर्दोष मुक्तता केलीय. 

Updated: Feb 23, 2016, 03:29 PM IST
१८ वर्ष जुन्या प्रकरणात दिलीप कुमार यांची निर्दोष मुक्तता title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची एका १८ वर्ष जुन्या प्रकरणात गिरगाव न्यायलायाने निर्दोष मुक्तता केलीय. 

चेक बाऊन्स प्रकरणात कंपनीच्या मानद डायरेक्टरला दोषी ठरवता येत नाही. दिलीप कुमार हे जीके या कंपनीचे मानद संचालक होते. त्यामुळे जीके या कंपन्यांच्या रोजच्या कामाकाजाशी त्यांचा थेट संबंध नव्हता. त्यामुळे या प्रकरणात दिलीप कुमार यांना दोषी ठरवण्यास न्यायालयाने नकार देत त्यांची निर्देश मुक्तता केलीय. 

त्याचसोबत, विमल कुमार राठी यांनाही न्यायालयाने निर्दोष मुक्त केलंय तर, याच प्रकरणातील एस सेतूरमन आणि गोपालकृष्ण राठी यांना न्यायालयाने दोषी ठरवलंय. दरम्यान आज कोर्टात दोन्ही पक्ष गैरहजर होते.

दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांनी ट्विटरद्वारे या प्रकरणाची माहिती कळवली होती. सायरा बानो यांनी ट्विट लिहून दिलीप कुमार यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची प्रार्थना केली होती. कारण अशा प्रकारे वयाच्या ९४ व्या वर्षी दिलीप कुमार न्यायालयात हजर राहिले तर त्यांची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे दिलीप कुमार यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करावी, अशी अपील सायरा बानू यांनी केली होती.

'डेक्कन सीमेंट्स' या कंपनीने ही केस फाईल केली होती. १९९८ साली दिलीप कुमार हे कोलकातातील ट्रेडिंग कंपनी जीके एक्जिम इंडिया लि. चे मानद संचालक होते. डेक्कन सीमेंट्स ने या जीके कंपनीत १ कोटी रुपये गुंतवणूक केली होती. पण जेव्हा ही रक्कम परत करण्याची वेळ आली तेव्हा दिलीप कुमार यांच्या कंपनीने दोन चेक डेक्कन कंपनीला दिले. पण ते चेक बाऊन्स झाले.

त्याआधारे डेक्कन या कंपनीने दिलीप कुमार यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार या दिलिप कुमारसह चौघांवर निगोशेबल इन्स्ट्रूमेन्ट कलम १३८ नुसार खटला भरण्यात आला होता. जो गेली १८ वर्ष सुरु होता.