नवी दिल्ली : 'बिग बॉस'फेम बॉबी डार्लिंग ऊर्फ पंकज शर्मा अखेर विवाहाच्या बंधनात अडकलीय.
८ फेब्रुवारी २०१६ रोजी अभिनेत्री बॉबी डार्लिंग हिनं दीर्घकाळापासून रिलेशनशीपमध्ये असलेला बॉयफ्रेंड रामनिक शर्मा याच्यासोबत लग्नगाठ बांधलीय.
एव्हढचं नाही तर आता बॉबी डार्लिंगनं आपलं नावही बदललंय. तिनं पंकजऐवजी आता 'पाखी' हे नाव धारण केलंय.
भोपाळच्या एका गायत्री मंदिरात हा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी त्यांनी आपल्या विवाहाच कायदेशीररित्या रजिस्ट्रेशनही करून घेतलंय.
त्यामुळे, आता बॉबी डार्लिंग 'नवाबी शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोपाळची सून झालीय. रामनिक शर्मा हा मूळचा भोपाळचा रहिवासी आहे. त्यालाही बॉलिवूडमध्ये आपल्या करिअर आजमावयची इच्छा आहे.
बॉबी डार्लिंगचं खरं नाव आहे पंकज शर्मा... बॉबीनं २३ वर्षांच्या वयापर्यंत १८ गे भूमिका केल्यात... हा त्याचा अनोखा रेकॉर्ड 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्येही नोंदविण्यात आलाय. बिग बॉसनंतर स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर त्याला अनेक चाहतेही लाभले.
बॉबी आणि रामनिकची भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली. त्यानंतर फेसबुकवरून एकमेकांशी संवाद साधता साधता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले... आणि मग एकदिवस अंकितनंच आपल्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्याला बॉबीनंही होकार दिला.