'दिल दोस्ती दुनियादारी' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठीवर गेल्या वर्षी आलेली 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. लहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच या मालिकेवर भरभरुन प्रेम केले होते. या मालिकेतील आशु, कैवल्य, सुजय, रेश्मा, मीनल आणि अॅना या पात्रांनी प्रेक्षकांना आपलेसे केले होते. 

Updated: Jan 25, 2017, 03:57 PM IST
'दिल दोस्ती दुनियादारी' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : झी मराठीवर गेल्या वर्षी आलेली 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. लहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच या मालिकेवर भरभरुन प्रेम केले होते. या मालिकेतील आशु, कैवल्य, सुजय, रेश्मा, मीनल आणि अॅना या पात्रांनी प्रेक्षकांना आपलेसे केले होते. 

लिमिटेड एपिसो़डची ही मालिका होती. त्यानंतर ही मालिका संपली होती. मात्र आता पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेये. नव्या रुपात आणि नव्या ढंगात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 

अद्वैत दादरकर या दुसऱ्या पर्वाचे दिग्दर्शन करणार आहेत. याआधी विनोद लवेकर यांनी दिग्दर्शन केले होते. या नव्या सीजनमध्ये या सहा जणांच्या गँगमध्ये आणखी दोन जण सामील होणार आहेत. त्यामुळे मनोरंजानाची जबरदस्त धमाल तुम्हाला पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.