हनीसिंगच्या आवाजात 'धीरे धीरे से मेरे जिंदगी मे आना'

आशिकी सिनेमातली सर्वच गाणी नव्वदच्या दशकात गाजली होती, ही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती, आशिकी या सिनेमातली सर्वच गाणी गाजली होती. आजही आशिकी सिनेमाचं नाव काढल्यावर ज्यांनी यापूर्वी आशिकी सिनेमातली गाणी ऐकली आहेत, ती गाणी त्यांच्या सहज तोंडावर येतात.

Updated: Sep 3, 2015, 05:46 PM IST
हनीसिंगच्या आवाजात 'धीरे धीरे से मेरे जिंदगी मे आना' title=

मुंबई : आशिकी सिनेमातली सर्वच गाणी नव्वदच्या दशकात गाजली होती, ही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती, आशिकी या सिनेमातली सर्वच गाणी गाजली होती. आजही आशिकी सिनेमाचं नाव काढल्यावर ज्यांनी यापूर्वी आशिकी सिनेमातली गाणी ऐकली आहेत, ती गाणी त्यांच्या सहज तोंडावर येतात.

आजही नव्वदीत शाळेत आणि कॉलेजात असलेले आशिकीची गाणी गातात, मात्र काळानुसार नव्या पिढीतील काहींनी ही गाणी ऐकली नसतील. आता जमाना योयो हनिसिंगचा आहे. योयोने ही आशिकी सिनेमाच्या गाण्याचं रिमेक गायलं आहे. 

'धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना' या गाण्याचं रिमेक सोनम कपूर आणि हृत्विक रोशनवर चित्रित करण्यात आले आहे, आशिकी सिनेमातलं गाणं हे राहुल रॉय आणि अभिनेत्री अनु अग्रवाल यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं.

पाहा योयो हनिसिंगच्या आवाजात 'धीरे धीरे से मेरे जिंदगी मे आना'चं रिमेक

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.