दीपिका पदुकोणची 'हॉलीवूड' वारी

बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका पदुकोण आता हॉलीवूडला निघाली आहे.

Updated: Jan 6, 2016, 07:53 PM IST
दीपिका पदुकोणची 'हॉलीवूड' वारी title=

मुंबई : बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका पदुकोण आता हॉलीवूडला निघाली आहे.  हॉलीवूडचा सुपरस्टार विन डिजल सोबत दीपिका आपला पहिल्या हॉलीवूड चित्रपटामध्ये काम  करणार आहे. दोघांचा फोटोही सध्या चांगलाच व्हायरल झालाय.

दीपिका हॉलीवूडच्या xxx या सिरीजमध्ये काम करणार असून लवकरच शुटींग सुरू होणार आहे. xxx :The Return of Xander Cage च्या दिग्दर्शकाने ट्विट करून याची पुष्टी केली आहे.

दीपिका पदुकोण हिने विन डीजल याच्यासोबत काढलेला एक सेल्फी शेअर केला आहे. फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये xxx चा लोगो दिसत आहे. त्यामुळे दीपिकाची आता हॉलीवूड वारी नक्की झाली आहे.