मुंबई : 'माय च्वॉईस' या व्हिडिओच्यामाध्यमातून चर्चेत असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण पुन्हा एकदा चर्चे आली आहे. यावेळी व्हिडिओ नाही तर आपल्या बॉयफ्रेंड रणवीर सिंगमुळे.
बॉलिवूडमध्ये चर्चा आहे की, दीपिका एक रात्र रणवीरची काळजी घेण्यासाठी हॉस्पीटलमध्ये थांबली होती. दीपिका रात्री उशिरा शनिवारी ९ वाजता रणवीरला भेटण्यासाठी हॉस्पीटलमध्ये गेली. ती रात्रभर त्याच्या उशाजवळ बसून होती. रणवीरला हॉस्पीटलमधून सुट्टी देण्यापूर्वी म्हणजे सकाळी ती निघून गेली.
मुंबईतील एका हॉस्पीटलमध्ये रणवीरच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. बाजीराम मस्तानी या सिनेमाच्यावेळी त्याला दुखापत झाली होती. रणवीरने ऑपरेशनबाबत ट्विट केले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.