दीपिकाला साखरपुड्याच्या हेमा मालिनींनी दिल्यात शुभेच्छा

ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांनी आज दीपिकाला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्यात. या शुभेच्छामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. 

Updated: Apr 28, 2016, 01:06 PM IST
दीपिकाला साखरपुड्याच्या हेमा मालिनींनी दिल्यात शुभेच्छा title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांनी आज दीपिकाला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्यात. या शुभेच्छामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. 

दीपिका तुला साखरपुड्याच्या शुभेच्छा. तुम्हा दोघांना उज्ज्वल भविष्य, आनंद आणि सुखी जीवन प्राप्त होवो, अशी मी देवाकडे प्रार्थना करते, असे ट्विट हेमामालिनी यांनी केले.

या शुभेच्छामुळे अनेकांना वाटले हेमामालिनी यांनी दीपिका पदुकोणला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिका सध्या टोरान्टोमध्ये XXX : Return of Xander Cage या हॉलीवूडच्या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे दीपिकाने परदेशात कधी आणि कोणाशी साखरपुडा केला, असा प्रश्न पडला.

हेमामालिनींना हे जेव्हा समजले, तेव्हा त्यांनी दुसरे ट्विट केले. हेमामालिनी यांनी यासंदर्भातील खुलासा करत ती दीपिका पदुकोण नसल्याचे सांगितले. ही दीपिका म्हणजे माझी ट्विटरवरील फॉलोअर असल्याचे हेमामालिनी यांनी स्पष्ट केले.