अमेरिकेतही झिंगाट गाण्यावर प्रेक्षकांचा 'सैराट' डान्स

भारतातच नव्हे तर भारताबाहेरही सैराट चित्रपटाची मोठी क्रेझ दिसून येतेय. कतारमध्ये या सिनेमातील झिंगाट गाण्यावर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये ठेका धरला होता.

Updated: May 9, 2016, 10:53 AM IST
 अमेरिकेतही झिंगाट गाण्यावर प्रेक्षकांचा 'सैराट' डान्स title=

मुंबई : भारतातच नव्हे तर भारताबाहेरही सैराट चित्रपटाची मोठी क्रेझ दिसून येतेय. कतारमध्ये या सिनेमातील झिंगाट गाण्यावर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये ठेका धरला होता.

त्यानंतर अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली येथीलही एका थिएटरमध्ये प्रेक्षक झिंगाट गाण्यावर तुफान नाचले. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर असं एकही थिएटर नाही जेथे प्रेक्षक झिंगाट गाण्यावर नाचले नाहीत.

 

या गाण्याने तर सर्वांना वेड लावून टाकलाय. देशविदेशात सैराट चित्रपटाला प्रेक्षक जबरदस्त प्रतिसाद देतायत.

यातील आर्ची आणि परश्याची भूमिका साकारणाऱ्या रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी पदार्पणाच्या सिनेमातच प्रेक्षकांची मने जिंकून घेतलीत. रिंकूला तिच्या उत्तम अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.