बंगळुरू: एका डॉक्टरची सेक्स टेप बनवून त्याला ब्लॅकमेल केल्याच्या आरोपात कन्नड अभिनेत्री नयना कृष्णाला अखेर पोलिसांनी अटक केलीय. खरं तर तिला दुसऱ्या एका ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. पण या दुसऱ्या प्रकरणातही तिला अटक करण्यात आलीय.
मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरूच्या सुंदर राम शेट्टी नगरच्या एका डॉक्टरांनी नयनावर ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी बुधवारी तिला कोर्टात हजर केलं आणि कोर्टानं तिला १० दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवलंय.
यापूर्वी ४ जूनला नयना विरोधात एका ६८ वर्षीय डॉक्टरानं सेक्सच्या बहाण्यानं आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप केला होता. या डॉक्टरचा आरोप होता की, नयना आणि तिच्या साथिदारांनी आपल्या गँगच्या एका महिलेसोबत डॉक्टरला सेक्स करण्याचं लालूच दाखवलं आणि त्यानंतर लपून त्याची व्हिडिओ टेप केली. या टेपच्या आधारावर गँग डॉक्टरला ब्लॅकमेल करत होती.
त्यांनी डॉक्टरांकडून १ कोटी रुपयांची मागणी केली आणि त्यानंतर २५ लाखांवर राजी झाले. नयन विरुद्ध पहिली तक्रार ४ जूनला दाखल झाली. मात्र जमानत मिळाल्यानंतर ती तब्बल ४ महिने पोलिसांच्या हाती लागली नव्हती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.