बिग बी ऑनलाइनच्या माध्यमातून चाहत्याशी जोडले जाणार

Updated: Oct 9, 2014, 02:24 PM IST
बिग बी ऑनलाइनच्या माध्यमातून चाहत्याशी जोडले जाणार title=

 

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला 72वा वाढदिवस आहे. या आठवड्यात त्यांच्या लाखो चाहत्यांशी एकाच मंचावर जोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर आणि देशातील सर्वात मोठ्या सेलिब्रिटी डिजिटल मीडिया नेटवर्क फ्लूयेन्सशी जोडून या कामाला सुरुवात करणार आहे. फ्लूयेन्स हे डिजिटल नेटवर्कच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी जोडण्यास मदत करणार आहे.

दरवर्षी चाहत्यांना माझ्या प्रति असलेले  प्रेम मी जाणतो. त्यामुळं ट्विटर आणि फ्लूयेन्सच्या माध्यमातून माझ्या प्रत्येक चाहत्याला स्वतः आभार व्यक्त करायचे आहे. प्रत्येक वर्गात बच्चन यांचा चाहता आपल्याला दिसून येतात. फेसबूक, ट्विटर आणि टम्बलर यासारख्या सोशल मीडियाच्या मंचावर त्यांना अनेक जण फॉलो करतात. त्याना फॉलो करणाऱ्यांची संख्या ३ कोटींपेक्षा अधिक आहे.

दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियाई क्षेत्रातील ट्विटर मार्केट डायरेक्टर ऋषी जेली यांनी सांगितले की, ट्विट्वर बच्चन यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या लाखो चाहतांमध्ये उत्साह दिसून येत आहे. हे सर्व काम बच्चन यांच्या जन्मदिवसा व्यतिरिक्त म्हणजे ११ पासून ते १५ ऑक्टोबर या पाच दिवसांपर्यंत सुरू असणार आहे. सोशल मीडियाशी जोडून चाहत्यांना हॅश एबी 72 विषेश हॅशटॅग पाठवावे लागणार आहे. जेणेकरून बच्चन यांचं स्वाक्षरी असलेलं डिजिडल पोस्टर मिळणार आहे आणि जे चाहते नशीबवान असतील. त्यांना बच्चन यांचा व्हिडिओ संदेश देखील मिळेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.