ब्रिटीश बँडच्या अल्बममध्ये उलगडले मुंबईचे सुरेख रंग

मुंबई : 'कोल्डप्ले' या प्रसिद्ध ब्रिटीश रॉक बँडने आपला नवीन अल्बम 'अ हेड फुल्ल ऑफ ड्रीम्स' नुकताच लाँच केलाय.

Updated: Jan 30, 2016, 11:07 AM IST
ब्रिटीश बँडच्या अल्बममध्ये उलगडले मुंबईचे सुरेख रंग title=

मुंबई : 'कोल्डप्ले' या प्रसिद्ध ब्रिटीश रॉक बँडने आपला नवीन अल्बम 'अ हेड फुल्ल ऑफ ड्रीम्स' नुकताच लाँच केलाय. भारतीयांसाठी याचं आकर्षण म्हणजे यातील एक गाणं पूर्णपणे मुंबईत चित्रीत करण्यात आलंय. 'हिम फॉर द वीकेण्ड' असं या गाण्याचं नाव आहे. 

सप्टेंबर महिन्यात या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं होतं. मुंबईतील वरळी गाव, इम्पिरियल सिनेमा, वसईचा किल्ला, बाणगंगा तलाव अशा अनेक प्रसिद्ध स्थळांवर या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलंय. 

गाण्यात रंगांचा खूप वापर करण्यात आलाय. होळीचे रंग, मुंबईची चित्रनगरी म्हणून असलेली ओळख या सर्व गोष्टी गाण्याचे आकर्षण आहे. या गाण्यात बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरही आहे. गाण्याच्या मुख्य भागात अमेरिकी अभिनेत्री आणि गायिका बियॉन्से आहे बॉलिवूड रुपात दिसते.  

भारत सरकारच्या 'प्रेस इन्फर्मेशन ब्युरो'ने सुद्धा या गाण्याचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर हे गाणे सध्या फार चर्चेत आहे.