CCLच्या पहिल्या मॅचमध्ये सोहेलच्या 'मुंबई हिरोज'ची बाजी

ब्रेबॉर्न स्टेडिअमवर शनिवारी सेलिब्रिटी क्रिकेट लीग म्हणजेच सीसीएल (CCL)चं उद्घाटन झालं. लीगची पहिली मॅच सोहेल खानची 'मुंबई हिरोज' आणि रितेश देशमुखची टीम 'वीर मराठी' दरम्यान झाली.

Updated: Jan 11, 2015, 06:19 PM IST
CCLच्या पहिल्या मॅचमध्ये सोहेलच्या 'मुंबई हिरोज'ची बाजी title=

नवी मुंबई: ब्रेबॉर्न स्टेडिअमवर शनिवारी सेलिब्रिटी क्रिकेट लीग म्हणजेच सीसीएल (CCL)चं उद्घाटन झालं. लीगची पहिली मॅच सोहेल खानची 'मुंबई हिरोज' आणि रितेश देशमुखची टीम 'वीर मराठी' दरम्यान झाली.

दोन्ही टीममध्ये पहिलीच मॅच खूप जबरदस्त तोडीची झाली आणि डकवर्थ लुईस नियमाअंतर्गत 'मुंबई हिरोज' या सोहेलच्या टीमनं विजय मिळविला.

मॅच दरम्यान सोहेल खानची पत्नी सीमा सचदेव, मुलगा निर्वान, बहिण अर्पिता उपस्थित होते. मॅच दरम्यान जेनेलिया सुद्धा रितेश आणि टीमला चिअरअप करण्यासाठी उपस्थित होती. तर रितेशचा भाऊ धीरज देशमुख पण आपल्या मुलासह उपस्थित होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.