बॉक्स ऑफिस : उडता पंजाबने दोन दिवसांत कमावले २१ कोटी

प्रदर्शनासाठी लीक झालेला उडता पंजाब हा सिनेमा चांगली कमाई करताना दिसतोय. प्रदर्शनानंतर दोन दिवसांत या चित्रपटाने २१ कोटींचा आकडा पार केलाय. 

Updated: Jun 20, 2016, 11:27 AM IST
बॉक्स ऑफिस : उडता पंजाबने दोन दिवसांत कमावले २१ कोटी title=

मुंबई : प्रदर्शनासाठी लीक झालेला उडता पंजाब हा सिनेमा चांगली कमाई करताना दिसतोय. प्रदर्शनानंतर दोन दिवसांत या चित्रपटाने २१ कोटींचा आकडा पार केलाय. 

चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी १० कोटी आणि त्यानंतर शनिवारी ११ कोटींची कमाई केली. रविवारीही या चित्रपटाने चांगली कमाई केल्याची आशा व्यक्त केली जातेय. चित्रपट समीक्षक तरण आदर्शच्या मते तिसऱ्या दिवसाची कमाई मिळून चित्रपटाची वीकेंडची कमाई ३४ कोटींहून अधिक असू शकते. 

शाहिद कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर खान आणि दिलजीत दोसांझ स्टारर हा चित्रपट २००० थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.