बॉक्स ऑफिसवर रईस आणि काबिलमध्ये टक्कर : कमाई कोण गेलं पुढे?

 बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचे चित्रपट रईस आणि काबिल यांच्यात जबरदस्त टक्कर सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या कमाईवर नजर टाकली तर रईसने काबिलला मागे टाकले आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 27, 2017, 05:49 PM IST
 बॉक्स ऑफिसवर रईस आणि काबिलमध्ये टक्कर :  कमाई कोण गेलं पुढे?  title=

मुंबई :  बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचे चित्रपट रईस आणि काबिल यांच्यात जबरदस्त टक्कर सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या कमाईवर नजर टाकली तर रईसने काबिलला मागे टाकले आहे. 

बॉक्स ऑफिसवर 'रईस'ने दोन दिवसात ४६.७२ कोटी कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 'रईस'ने २०.४२ कोटी कमाई केली होती. आणि दुसऱ्या दिवशी २६.३० कोटी कमाई केली आहे. 

 

तसेच 'काबिल'ने दोन दिवसात सुमारे २४ कोटी कमाई केली आहे. यात पहिल्या दिवशी ११ कोटी आणि  दुसऱ्या दिवशी १३ कोटी कमाविले आहे. 

या दोन्ही चित्रपटांच्या दृष्टीने पुढील तीन दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी विकेंडला यांचा कस लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत रईस १०० कोटीचा आकडा पाच दिवसात पूर्ण करणार आहे. तर काबिलला जास्त काळ जावा लागणार आहे. रईस चित्रपट ३५०० स्क्रिनवर रिलीज झाली तर काबिल २७०० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे.