बाजीराव विरुद्ध दिलवाले, पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी?

शुक्रवारी बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे दोन बडे सिनेमे रिलीज झाल्याने बॉक्स ऑफिसवर मोठा मुकाबला सुरु झालाय. शाहरुख आणि काजोलची एव्हरग्रीन जोडीचा दिलवाले तर दुसरीक़डे दीपिका आणि रणवीर सिंह यांचा बाजीराव मस्तानी एकाचवेळी प्रेक्षकांच्या भेटीस आलेत.  

Updated: Dec 19, 2015, 10:19 AM IST
बाजीराव विरुद्ध दिलवाले, पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी? title=

नवी दिल्ली : शुक्रवारी बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे दोन बडे सिनेमे रिलीज झाल्याने बॉक्स ऑफिसवर मोठा मुकाबला सुरु झालाय. शाहरुख आणि काजोलची एव्हरग्रीन जोडीचा दिलवाले तर दुसरीक़डे दीपिका आणि रणवीर सिंह यांचा बाजीराव मस्तानी एकाचवेळी प्रेक्षकांच्या भेटीस आलेत. पहिल्याच दिवशी या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र दिलवालेला एकूण थिएटरपैकी ६५ टक्के थिएटर मिळाले तर बाजीरावला ३५ टक्क्यांवर समाधान मानावे लागले. 

अनेक राज्यांमधील विरोधानंतरही प्रदर्शित झालेल्या बाजीराव-मस्तानीने पहिल्या दिवशी १५-१७ कोटी रुपयांची कमाई केली. तर रोहित शेट्टी दिग्दर्शित दिलवालेने २४ ते २६ कोटी रुपयांची कमाई केली. 

दिलवालेची ५० टक्के वीकेंड अँडवान्स बुकिंग झालीय. तर बाजीरावचीही ५० टक्के वीकेंड अँडवान्स बुकिंग झालीय. त्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी दोन्ही चित्रपटांचे ५०-५० टक्के खेळ रंगतील. चित्रपट समीक्षकांनी दिलवालेच्या तुलनेत बाजीराव-मस्तानीला अधिक पसंती दर्शवलीय.