मुंबई : हल्ली बॉलीवूड चित्रपटा हॉट आणि बोल्ड सीन्स असणे सामान्य गोष्ट झालीये. मात्र कलाकारांना हे बोल्ड सीन्स शूट करणे काही सोपे नसते. चित्रपटात हॉट सीन्स बघताना प्रेक्षकांना ते सोपे वाटतात मात्र असे सीन करताना कलाकारांनाही घाम फुटतो.
यावेळी कलाकारांना कम्फर्ट झोनमध्ये आणण्यासाठी दिग्दर्शक विशेष सोय करतात. रागिनी एमएमएस२ च्या शूटिंगदरम्यान सनी लिओनला शूटिंग करताना कम्फर्टेबल वाटावे यासाठी दिग्दर्शक भूषण पटेल यांनी अनेक क्रू सदस्यांना शूटिंग खोलीच्या बाहेर जाण्यास सांगितले होते.
याचप्रमाणे अनुराग कश्यप यांच्या २० मिनिटांच्या शॉर्ट फिल्ममध्ये अभिनेत्री राधिका आपटेचा बोल्ड सीन आहे. या सीनच्या शूटिंगदरम्यान कश्यप यांनी महिला क्रू मेंबरला बोलावले होते. त्यामुळे राधिकाला तो सीन योग्यप्रकारे करता आला.