'दिलवालेमध्ये काम केल्याचा पश्चात्ताप होतोय'

बॉलीवूड अभिनेत्री काजोलने शाहरुख खान सोबतच्या 'दिलवाले'मध्ये काम करण्याबाबत पश्चात्ताप व्यक्त केलाय. 

Updated: Jan 25, 2016, 10:17 AM IST
'दिलवालेमध्ये काम केल्याचा पश्चात्ताप होतोय' title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री काजोलने शाहरुख खान सोबतच्या 'दिलवाले'मध्ये काम करण्याबाबत पश्चात्ताप व्यक्त केलाय. 

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'दिलवाले' चित्रपटात शाहरुख आणि काजोलची जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली होती. मात्र या चित्रपटात काम केल्याबद्दल काजोलने खेद व्यक्त केल्याच्या बातम्या सध्या चर्चिल्या जातायत. 

या चित्रपटाद्वारे शाहरुख-काजोलची जोडी पुन्हा प्रेक्षकांना भुरळ घालेल असे वाटले होते मात्र हा चित्रपट तितका यशस्वी ठरु शकला नाही. 

काजोलला सुजॉय घोष यांचा 'दुर्गा रानी सिंह' आणि 'दिलवाले' या दोन चित्रपटात काम कऱण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र काजोलने 'दिलवाले'ला पसंती दर्शवली. मात्र 'दुर्गा रानी सिंह'मध्ये चांगले काम करु शकले असते असे काजोलला वाटते. 'दिलवाले'मध्ये आपली भूमिका काही खास नव्हती, असं तिच म्हणणं आहे.