नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेता पूरब कोहली आणि ल्युसी पेटॉन यांना कन्यारत्नाचा लाभ झालाय. आई आणि बाळ दोघेही सुखरुप असल्याची माहिती पूरबने दिलीय.
लंडनमध्ये मंगळवारी सायंकाळी ल्युसीने कन्येला जन्म दिलाय. 'हा जगातील सर्वात सुंदर अनुभव आहे. आई आणि बाळ दोघेही व्यवस्थित आणि हेल्थी आहेत, असे पूरबने सांगितले.
पूरब सध्या रॉक ऑन २ सिनेमांमध्ये व्यस्त आहे. त्याचदरम्यान त्याच्या घरी ही गुडन्यूज आलीय. तसेच तो अक्षयच्या आगामी एअरलिफ्ट या चित्रपटातही दिसणार आहे.