सहाव्या दिवशी बाजीरावची बॉक्स ऑफिसवर बाजी

१८ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेले बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर कमाईचे चांगलेच इमले रचतायत. 

Updated: Dec 24, 2015, 04:14 PM IST
 सहाव्या दिवशी बाजीरावची बॉक्स ऑफिसवर बाजी title=

मुंबई : १८ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेले बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर कमाईचे चांगलेच इमले रचतायत. शाहरुख आणि काजोलची जोडी असलेला दिलवाले भारतात १०० कोटींच्या घरात जाण्याच्या जवळपास पोहोचला आहे. सहाव्या दिवशी बुधवारी या चित्रपटाने ८.७९ कोटी रुपयांची कमाई केलीय. त्याबरोबरच आतापर्यंत एकूण ९३.३९ कोटींची कमाई या चित्रपटानं केलीय.

सहाव्या दिवशी बाजीराव दिलवालेवर वरचढ राहिला. बुधवारी बाजीरावने ९.२१ कोटींची कमाई केली. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण सहा दिवसांत ७५.६३ कोटी रुपयांची कमाई केलीये.
सुरुवातीला संथ सुरुवात कऱणारा बाजीरावने बॉक्स ऑफिसवर चांगलाच जोर धरलाय. वीकेंडमध्येही या चित्रपटाने चांगली कमाई केलीय. 

बॉलीवूडमध्ये स्टार फॅक्टर अधिक काम करते. सुरुवातीला दिलवालेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र समीक्षकांच्या मते बाजीराव मस्तानी चांगला चित्रपट असल्याने लोकांची पावले बाजीराव मस्तानीकडे वळली. चौथ्या दिवसाच्या कमाईत बाजीरावने दिलवालेला पाठी टाकले.