'पीके'त पाच सेकंदाचा रोल आणि भिकाऱ्याचं आयुष्यचं पालटलं

आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांच्या 'पीके' या सिनेमानं एका भिकाऱ्याचं जीवनचं पालटून टाकलंय. केवळ पाच सेकंदाची भूमिका त्याच्यासाठी वरदान ठरलीय.

Updated: Dec 20, 2014, 08:30 AM IST
'पीके'त पाच सेकंदाचा रोल आणि भिकाऱ्याचं आयुष्यचं पालटलं title=

मुंबई : आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांच्या 'पीके' या सिनेमानं एका भिकाऱ्याचं जीवनचं पालटून टाकलंय. केवळ पाच सेकंदाची भूमिका त्याच्यासाठी वरदान ठरलीय.

मूळचा आसामचा असलेला मनोज रॉय हा तरुण दिल्लीच्या जंतर-मंतर भागात आंधळं बनण्याचं नाटक करून भीक मागत होता. 'पीके'च्या युनिटनं त्याचा हा भंपकपणा हेरला आणि त्याला एका गाण्यामध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. 

कशी मिळाली अभिनयाची संधी... 
चोरी पकडली गेलीय हे पाहून पहिल्यांदा चांगलाच घाबरलेला मनोज 'पीके'च्या युनिटनं अभिनयाविषयी विचारल्यावर मात्र थोडा शांत झाला. सोबत त्याला २० रुपयांची नोटही मिळाली. टीमनं दिलेल्या नंबरवर त्यानं दुसऱ्या दिवशी फोन केला तेव्हा त्याला नेहरु स्टेडियममध्ये पोहचण्यास सांगण्यात आलं. इथं त्याला आमिर खानला पहिल्यांदा समोरासमोर पाहण्याची संधी मिळाली. इथं उभ्या असलेल्या सात भिकाऱ्यांबरोबर त्याचं ऑडिशन झालं आणि आठवडाभरानंतर त्याची निवड झाल्याचं सांगण्यात आलं.

सिनेमामध्ये एक तरुण रस्त्याच्या बाजुला भीक मागताना दिसतो... यावेळी या सीनमध्ये आमिर खान स्क्रिनवर दिसतो आणि नाचायला लागतो... तेव्हा हा भिकारी सीनमधून बाहेर निघून जातो... एवढ्या वेळात म्हणजे पाच सेकंदांसाठी मनोज स्क्रिनवर दिसतोय. 

नोकरी मिळाली... 
या पाच सेकंदाच्या भूमिकेनंतर या तरुणाला आता भीक मागण्याचीही गरज उरलेली नाहीय. त्याला आता त्याच्याच गावात एका दुकानावर चांगल्या पगाराची नोकरी मिळालीय. इतकंच नाही तर हा भिकारी सोशल वेबसाईट फेसबुकवरही अॅक्टीव्ह झालाय. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर भीक मागणारा हा तरुण आज जगभरातील ४८४४ स्क्रिनवर आमिर खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसतोय. 

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची संधी
सिनेमात निवड झाल्यानंतर भिकारी मनोजला दिल्लीच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळाली. १०-१० दिवस आंघोळ न करणाऱ्या मनोजला स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त डुंबण्यास मिळालं.

प्रेयसीही मिळाली... 
इतकंच नाही, तर गरिबीमुळे त्याच्यापासून दूर झालेली त्याची प्रेयसीही त्याला पुन्हा मिळालीय... ते देखील पीकेच्या या पाच मिनिटांच्या भूमिकेमुळेच... 'पीके' या सिनेमात काम केल्याचं त्यानं त्याच्या गावातल्या लोकांना सांगितलं तेव्हा गावी त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. आपल्यासाठी नोकरी, प्रेम आणि फेसबुक अकाऊंट ही सगळी 'पीके'चीच देण असल्याचं मनोज कबुल करतोय. 

'आंधळा भिकारी'
आसामच्या ३९ या युवकाचं नाव मनोज रॉय आहे. त्याचे वडील मजूर होते. आईचं मनोजच्या जन्मानंतर काही दिवसांतच निधन झालं होतं... शाळा सोडून मनोजनं भीक मागणं सुरू केलं होतं. जवळपास २० वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात तो दिल्लीला आला होता. नोकरी मिळाली नाही तेव्हा आंधळ्याचं नाटक करून तो भीक मागायला लागला. आता मात्र मनोजला आसामी किंवा बंगाली सिनेमांत काम करण्याची इच्छा आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.