बिपाशा आणि करणच्या घरी येणार नवा पाहुणा ?

काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेलं बॉलिवूड कपल बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बिपाशा बसु प्रेग्नेंट असल्याची चर्चा आहे. दोघेही येणाऱ्या बाळाच्या स्वागताची तयारी करत आहेत.

Updated: Nov 7, 2016, 11:29 PM IST
बिपाशा आणि करणच्या घरी येणार नवा पाहुणा ? title=

मुंबई : काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेलं बॉलिवूड कपल बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बिपाशा बसु प्रेग्नेंट असल्याची चर्चा आहे. दोघेही येणाऱ्या बाळाच्या स्वागताची तयारी करत आहेत.

करण आणि बिपाशा यांना एका डॉक्टरकडे जातांना पाहिलं गेलं आहे. दोघांनी ही याबाबतची अजून कोणतीही बातमी नाही दिली आहे.

करण सिंह ग्रोवर याचं अभिनेत्री श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेट यांच्यासोबत याआधी विवाह झाला होता. पण दोन्ही विवाह हे अयशस्वी ठरले. करणच्या आयुष्यात त्यानंतर बिपाशा आली. २०१५ मध्ये ‘हॉरर’सिनेमातून दोघं एकत्र आले.

करणच्या आधी बिपाशा जॉन अब्राहिमसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही बराच काळ एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. बिपाशाच्या विवाहानंतर जॉनने ही विवाह केला.