प्रेग्नंसीबाबत अखेर बिपाशाने सोडले मौन

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सध्या बीटाऊन तसेच सोशल मीडियावर होत आहे. मात्र बिपाशाने या बातमीचे खंडन केलेय. प्रेग्नंसीच्या बातमीत कोणतीच सत्यता नसल्याचे तिने म्हटलंय.

Updated: Nov 8, 2016, 03:19 PM IST
प्रेग्नंसीबाबत अखेर बिपाशाने सोडले मौन title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सध्या बीटाऊन तसेच सोशल मीडियावर होत आहे. मात्र बिपाशाने या बातमीचे खंडन केलेय. प्रेग्नंसीच्या बातमीत कोणतीच सत्यता नसल्याचे तिने म्हटलंय.

एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार बिपाशा म्हणाली, माझी लोकांना विनंती आहे की आमच्या जीवनातील मोठे निर्णय आम्हाला घेऊ द्या. माझ्या प्रेग्नंसीबाबतच्या बातमीत तथ्य नाही. माहीत नाही या अफवा कोण पसरवतंय. 

एप्रिलमध्ये बिपाशा आणि करण विवाहबद्ध झाले. करण सिंग ग्रोव्हरचा हा तिसरा विवाह आहे.