'अलोन' बिपाशाची नव्या बॉयफ्रेंडसोबत डिनर डेट

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हर यांच्या मैत्रीची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगतेय. अलोन चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर या दोघांना अनेकदा एकत्रच पाहिलं जातंय. नुकतंच मुंबईतील वांद्रे भागात एका रेस्टॉरंटमध्ये दोघं डिनर डेटला गेले होते. एकमेकांची कंपनी हे दोघं चांगलीच एंजॉय करतांना दिसले.

Updated: Apr 25, 2015, 10:34 AM IST
'अलोन' बिपाशाची नव्या बॉयफ्रेंडसोबत डिनर डेट title=

मुंबई: बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हर यांच्या मैत्रीची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगतेय. अलोन चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर या दोघांना अनेकदा एकत्रच पाहिलं जातंय. नुकतंच मुंबईतील वांद्रे भागात एका रेस्टॉरंटमध्ये दोघं डिनर डेटला गेले होते. एकमेकांची कंपनी हे दोघं चांगलीच एंजॉय करतांना दिसले.

जॉन अब्राहमनंतर बिपाशा बासूची हरमन बावेजासोबत एंगेज असल्याची चर्चा होती. काही काळानंतर दोघं लग्न करणार अशाही बातम्या आल्या. बिपाशाला अनेकदा हरमनच्या कुटुंबियांसोबतही पाहिलं गेलं. मात्र आता हे दोघं वेगळे झाले आहेत. 

तर दुसरीकडे करण ग्रोव्हरनं अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत लग्न केलं होतं. नंतर त्याचं अफेअर कोरिओग्राफर निकोलसोबत होतं. मग त्यानं छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबत विवाह केला. काही दिवसांपूर्वीच ते वेगळे झाले आहे. 

नुकताच करणच्या बर्थडेला बिप्स आणि मित्रांनी पार्टी केली होती. सोबतच त्यांना अनेक अॅवॉर्ड्स शोमध्येही एकत्र पाहिलं जातंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.