फिल्म रिव्ह्यू : एव्हेंजर्स - द एज ऑफ अल्ट्रोन

हॉलिवूडचा मोस्ट अवेटेड बिग बजेट सिनेमा एव्हेंजर्स - द एज ऑफ अल्ट्रोन ( THE ADGE OF ULTRON) तुमच्या भेटीला आलाय.

Updated: Apr 24, 2015, 11:04 PM IST
फिल्म रिव्ह्यू : एव्हेंजर्स - द एज ऑफ अल्ट्रोन title=

मुंबई : हॉलिवूडचा मोस्ट अवेटेड बिग बजेट सिनेमा एव्हेंजर्स - द एज ऑफ अल्ट्रोन ( THE ADGE OF ULTRON) तुमच्या भेटीला आलाय.

कथा...
जगभर अत्यंत गाजलेल्या मार्वल कॉमिकच्या सुपर हिरोंची ही टीम धाडली कारनामे करतांना तुम्हाला या सिनेामत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत. २०१२ मध्ये  आलेल्या एव्हेंजर्सचा हा सिक्वल आहे...एव्हेंजर्सचा दिग्दर्शन जोश व्हिडानने केलं आहे.

२०१२ मध्ये आलेल्या एव्हेंजर्स सुपर हिट झाल्यानंतर लगेचच त्याच्या सीक्वलचं प्लॅनिंग करण्यात आलं होतं. या सिनेमात मार्वलचे सुपर हिरो  IRON MAN , CAPTAIN AMERICA, THOR,HULK,BLACK WIDOW आणि HAWKEYE हे  अल्ट्रॉनचा कसा पराभव करतात हे यात पाहायला मिळणार आहे. एव्हेंजर्स THE ADGE OF ULTRON हा सिनेमा म्हणजे पैसा वसूल आहे.

अत्यंत भव्यदिव्य पद्धतीने हा सिनेमा साकारण्यात आला असून हॉलिवूडपटचे तुम्ही चाहते असाल तर हा सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल. या सिनेमातील स्पेशल इफ्केट डोळ्याचं पारणं फेडणारे आहेत.

स्टार्स -
तेव्हा या सिनेमाला मी 4 स्टार्स..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.