'एलिमिनेट' न होताच किश्वर पडली बिग बॉसच्या घरातून बाहेर!

'बिग बॉस'चा सीझन ९ कार्यक्रमांत येणाऱ्या ट्विस्टमुळे मजेशीर होत चाललेला दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीपासूनच बिग बॉसची एक दमदार सहभागी म्हणून ओळखली जाणारी किश्वर मर्चंट या कार्यक्रमातून अचानक बाहेर पडलीय. 

Updated: Jan 8, 2016, 03:41 PM IST
'एलिमिनेट' न होताच किश्वर पडली बिग बॉसच्या घरातून बाहेर! title=

मुंबई : 'बिग बॉस'चा सीझन ९ कार्यक्रमांत येणाऱ्या ट्विस्टमुळे मजेशीर होत चाललेला दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीपासूनच बिग बॉसची एक दमदार सहभागी म्हणून ओळखली जाणारी किश्वर मर्चंट या कार्यक्रमातून अचानक बाहेर पडलीय. 

'तिकीट टू फिनाले' या टास्क दरम्यान प्रिन्स  आणि किश्वर या दोघांना ऑफर करण्यात आलेली राशी घेऊन बिग बॉसच्या फिनालेमधून बाहेर पडण्याची संधी देण्यात आली होती.

पहिल्यांदा बझर वाजवणारी मंदना डायरेक्ट फिनालेमध्ये दाखल झाली. त्यानंतर किश्वर आणि प्रिन्स या दोघांपैकी जो पहिल्यांदा बझर वाजवेल त्याला ८ लाख रुपये घेऊन कार्यक्रम सोडता येईल, अशी ऑफर देण्यात आली. 

परंतु, दोघांनीही ही राशी न घेण्याचा निर्णय घेतला आणि टास्क सुरूच ठेवला. त्यानंतर ही बक्षिसाची रक्कम वाढवून १५ लाख रुपये करण्यात आली... आणि किश्वरनं हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला. 

१५ लाख रुपये घेऊन किश्वर आनंदानं या घराच्या बाहेर पडलीय. बाहेर पडताच किश्वरनं ट्विटरवरून आपल्या चाहत्यांचे आभार मानलेत. 

आता शेवटच्या टप्प्यात या कार्यक्रमात प्रिन्स, मंदना करिमी, प्रिया मलिक, ऋषभ सिन्हा, रोशेल राव आणि कीथ सिकेरा आहेत. यांपैकी एक जण बिग बॉसची ट्रॉफी आणि ५० लाखांच्या चेकसहीत या कार्यक्रमाचा विजेता बनणार आहे.