बिग बॉस 8 : भांडणाला सुरुवात!

‘बिग बॉस-सीझन ८’ चे पहिलं नॉमिनेशन पार पडलंय. यात बिग बॉसच्या विमानातील सर्व प्रवाशांनी नताशाला नॉमिनेट केलंय. कारण ती आतापर्यंत 'आउट ऑफ गेम' खेळणारी स्पर्धेक आहे. म्हणून तिला सर्वांनी टार्गेट केलंय.

Updated: Sep 26, 2014, 05:52 PM IST
बिग बॉस 8 : भांडणाला सुरुवात! title=

मुंबई : ‘बिग बॉस-सीझन ८’ चे पहिलं नॉमिनेशन पार पडलंय. यात बिग बॉसच्या विमानातील सर्व प्रवाशांनी नताशाला नॉमिनेट केलंय. कारण ती आतापर्यंत 'आउट ऑफ गेम' खेळणारी स्पर्धेक आहे. म्हणून तिला सर्वांनी टार्गेट केलंय.

गौतम गुलाटी याला ‘फुटेज आर्टिस्ट’ म्हणून चिडविण्याला सुरुवात केली आहे. खरी मज्जा तर पाचव्या दिवशी येणार आहे. बिग बॉसच्या विमानातून कोण पहिल्यादांचा आऊट होईल, हे आज कळेल.

'आउट ऑफ गेम' प्रवासी नको...

नताशाला ६ प्रवाशांनी नॉमिनेट केल्याचं दिसून आलं. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, जो एंटरटेन करणार तो प्रावसी इथे टिकून राहणार... आणि जे हे करणार नाही ते प्रवाशांना काढून टाकण्याचा सर्वांचा प्रयत्न असणार आहे. सुकृतीही बाकीच्या प्रवाशांच्या निशाण्यावर असणार आहे. कारण ही पुढे जाऊन प्रॉब्लम क्रिएट करु शकते...

उपेन, मिनिषा आणि सोनीचा सेफ गेम...

उपेन, मिनिषा लांबा आणि सोनी या तिघांपैकी कोणीही नॉमिनेट झाले नाही. कारण तिघांनीही बाकीच्या प्रवाशांबरोबर चांगले संबंध ठेवले आहे. त्यामुळे तिघेजण नॉमिनेट झाले नाही.

प्रणित विरोद्ध डियंड्रा-गौतम

शुकनी मामा उर्फ प्रणितनी गौतमला फुटेज आर्टिस्ट बोलून चिडविले होते. पण गौतम काही गप्पा बसणार व्यक्ती नाही. गौतमला चिडविल्याबदल डियांड्राने प्रणितला नॉमिनेट केले. बिग बॉस हे आता अजून मनोरंजक होणार असल्याचे पुढील काळातच दिसून येईल.

सिक्रेट सोसायटीची दादागिरी...

सिक्रेट सोसायटीचे सदस्य आर्य बब्बरला आवडत नाही. पण, हे सर्व प्रवाशांसमोर बोलणे टाळत आहे. आता सिक्रेट सोसायटीचे सदस्य देखील खेळाच्या मैदानात उतरून ऐकमेकांना नॉमिनेट करत आहे. पुढे काय होईल. हे पाहयला मज्जा येईल.     

बॉसगिरी नाही चालणार... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.