बाजीराव-मस्तानीचा दुसरा ट्रेलर हिट

बाजीराव-मस्तानी या सिनेमातील पिंगा या गाण्याने सोशल मीडियावर धिंगाणा घातला. अनेकांनी या गाण्यातून इतिहास चुकीचा दाखवल्याची टीका केली. असे असताना आता बाजीराव-मस्तानीचा दुसरा ट्रेलर लाँच करण्यात आलाय. हा ट्रेलर प्रियंका चोप्रा हिने फेसबुकवर अपलोड केल्यानंतर काही तासांतच याला लाखो हिट्स मिळाल्या.

Updated: Nov 21, 2015, 04:59 PM IST
बाजीराव-मस्तानीचा दुसरा ट्रेलर हिट title=

मुंबई : बाजीराव-मस्तानी या सिनेमातील 'पिंगा' या गाण्याने सोशल मीडियावर धिंगाणा घातला. अनेकांनी या गाण्यातून इतिहास चुकीचा दाखवल्याची टीका केली. असे असताना आता बाजीराव-मस्तानीचा दुसरा ट्रेलर लाँच करण्यात आलाय. हा ट्रेलर प्रियंका चोप्रा हिने फेसबुकवर अपलोड केल्यानंतर काही तासांतच याला लाखो हिट्स मिळाल्या.

बाजीराव-मस्तानी चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरप्रमाणेच दुसऱ्या ट्रेलरलाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. दुसऱ्या ट्रेलरमुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट पुढील महिन्यात 18 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यामुळे आणखी महिन्याभराची प्रतीक्षा चित्रपटप्रेमींना करावी लागणार आहे. 

पाहा दुसरा ट्रेलर

 

WOW the new #BajiraoMastaniTrailer is simply WOW! Ranveer Singh Deepika Padukone and Priyanka Chopra look SPECTACULAR! Bhansali MAGIC!

Posted by Priyanka Chopra Online on Friday, November 20, 2015

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.