आता बाहुबलीलाही कडेकोट बंदोबस्त!

बाहुबली चित्रपटातील रहस्यमय शेवटाचा फायदा नक्कीच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला होणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची प्रेक्षकांमधली  उत्सुकता दिग्दर्शक-निर्माता छान खेचून धरताएत.

Intern Intern | Updated: Mar 30, 2017, 03:36 PM IST
आता बाहुबलीलाही कडेकोट बंदोबस्त! title=

मुंबई : बाहुबली चित्रपटातील रहस्यमय शेवटाचा फायदा नक्कीच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला होणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची प्रेक्षकांमधली  उत्सुकता दिग्दर्शक-निर्माता छान खेचून धरताना दिसतात.

त्यासाठीच चित्रपटाचं शेवटचं काम चालू असलेल्या रुमला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्या रुममध्ये फक्त बोटावर मोजण्याइतक्या लोकांनाच प्रवेश आहे.

त्यामध्ये स्वत: दिग्दर्शक, निर्माते आणि तीन-चार एडीटर्स इतक्याच लोकांना आत जाता येतं. इतर कोणालाही परवानगीशिवाय सीसीटीव्ही असलेल्या त्या खोलीत जाता येत नाही. ज्यांना जायचे असेल त्यांची नीट तपासणी  केली जाते. 

मध्यंतरी चित्रपटातील युध्दाचा एक सिक्वेन्स आणि चित्रपटाचा ट्रेलर काही हॅकर्सनी ऑनलाईन अपलोड केला होता. त्यासंबंधात काही एडीटर्सवर कारवाईसुध्दा करण्यात आली होती.

या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता टीम इतकी काळजी घेते आहे. कारण पहिल्या चित्रपटाप्रमाणेच दुसऱ्या भागाकडूनही रेकॉर्डब्रेक कमाईची अपेक्षा आहे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांना चित्रपटात खेचून आणणे गरजेचे आहे.

चित्रपटातील कोणताही कलाकार प्रमोशन दरम्यान काही जास्त बोलत नाही. तशी तंबीच त्यांना देण्यात आलेली आहे. इतकंच नाही तर त्यांनाही त्या खोलीत सोडलं जात नाही.

या भागाच्या कथेबाबत जितकी जास्त गुप्तता राखता येईल तेवढी राखण्याचा प्रयत्न टीम करतेय. आता जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित करायचे म्हणजे इतकं तर करावंच लागणार नाही.